नवी दिल्ली : अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव तीन दिवसांपूर्वी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल आलं होतं. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
राम रहिम दोन महिला अनुयायांसोबत केलेल्या अत्याचारप्रकरणी २०१७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
गुरमीत राम रहीम यानं पोटदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर पीजीआय रोहतकमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या ठिकाणी त्याचं सिटी स्कॅन, एन्जिओग्राफी आणि फायब्रोस्कॅन करण्यात आलं. रोहतक पीजीआयनं त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्याला एम्स रुग्णालयात चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात येत नाही. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं त्याला मेदांता रुग्णालात नेण्याचा सल्ला दिला.
यापूर्वी, गुरुग्रामला जाऊन आजारी आई नसीब कौर यांना भेटण्यासाठी राम रहीमनं २१ दिवसांचा पॅरोल मागितला होता. परंतु, त्याला केवळ ४८ तासांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ५३ वर्षीय राम रहीम याला आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बलात्कार प्रकरणात पंचकूला स्थित सीबाआय विशेष न्यायालयानं २० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तो २०१७ पासून रोहतकच्या तुरुंगात बंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा; आ.मेटेंसह तीन हजार जणांवर गुन्हा दाखल
- ‘मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्याने देशात कोरोनाचे संकट गडद’
- ‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र
- ६२ दिवसांनंतर जालना जिल्हा उद्यापासून होणार अनलॉक
- विनायक मेटेंच्या पुढील सर्व आंदोलनात भाजप सहभागी होणार-आशिष शेलार


