🕒 1 min read
औरंगाबाद : महापालिकेकडून दाखल झालेल्यांपैकी गुंठेवारी नियमितीकरणासाठी आतापर्यंत ५८८ मालमत्तांच्या संचिकांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यातून पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी ३० लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांनी दिली. त्याचप्रमाणे महापालिकेत ८९० संचिका दाखल झाल्या आहेत.
शहरातील गुंठेवारी वसाहतीमधील मालमत्ता नियमित करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय गुंठेवारी कक्ष स्थापन केले आहेत. त्यासाठी कर्मचारी वर्ग देेखील दिला आहे. तसेच ५२ वास्तूविशारदांचे पॅनल तयार केले आहे. या पॅनलद्वारे प्रस्ताव दाखल केले जात आहेत. गुंठेवारी कक्ष प्रमुख म्हणून नगररचना विभागाचे उपअभियंता संजय चामले यांची नियुक्ती केलेली आहे. गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पालिका करत आहे. वास्तूविशारद यांच्याकडून प्रस्ताव दाखल केले जात आहे.
आतापर्यंत ८९० संचिका दाखल झाल्या असल्या तरी त्यापैकी ५८८ संचिकांसाठी चलन भरण्यात आले असून पालिकेच्या बँक खात्यात ५ कोटी ३० लाख रूपये जमा झाले आहेत. नवीन सुधारित महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार गुंठेवारीधारकांकडून आता महापालिकेने ३० सप्टेंबरपर्यंत आपले प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केली आहे. शासनाने दिलेल्या अर्टी-शर्तीनुसार गुंठेवारी संचिका दाखल केल्यास सात दिवसात संबंधित बांधकाम नियमित करावे अन्यथा बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्यात येईल असा इशाराच पांडेयजींनी दिला आहे. औरंगाबाद शहरात एकूण दोन लाख मालमत्तांचा यात समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या
- वंचित, दुर्लक्षित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे ‘मुप्टा’
- हिवाळी अधिवेशनात आमदारांसह प्रत्येकाला डोस नंतरही ‘आरटीपीसीआर’ टेस्ट सक्तीची
- ‘माझे पूर्ण ह्रदय एकाच फ्रेममध्ये..’म्हणत अनुष्काने केला विराटचा’तो’फोटो शेअर
- ‘मोदींच्या स्मार्ट सिटी, अमृत योजनांच्या अमिषाने शहरांची अधोगती झाली’, खा.वंदना चव्हाण यांचा आरोप
- गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सवाल


