🕒 1 min read
मुंबई : गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वकिली सनदेचा गैरवापर करत आहेत, त्यामुळे त्यांची वकिली सनद तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे करण्यात आली आहे. नितीन संजय यादव या व्यक्तीने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वकिली सनदेचा गैरवापर करत समाज विघातक कृत्य करत आहेत, त्यामुळे त्यांची वकिली सनद तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी नितीन संजय यादव यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे केली आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र आता कोल्हापूर, बीड किंवा पुणे पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणीही सदावर्ते यांच्यावर तक्रार दाखल आहेत. मराठा आरक्षणाच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर, आता सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
आता त्यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी बार कौन्सिलकडे करण्यात आल्याने सदावर्ते यांच्या समोरील अडचणींचा पाढा वाढत चालला आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल आता या मागणी संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
