Share

गोध्राकांडातील मुख्य आरोपी रफिक भटुकच्या तब्बल 19 वर्षांनी आवळल्या मुसक्या

Published On: 

अहमदाबाद : गुजरातच्या बहुचर्चित गोध्रा कांडमधील प्रमुख आरोपीला तब्बल 19 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी रफीक हुसैन भटुकला गोधरा शहरातून अटक करण्यात आली आहे. ही घटना 19 वर्षांपूर्वी घडली होती, ज्यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. मुख्य आरोपीला अटक झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.

पंचमहल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीक हुसैन भटुक हा संपूर्ण घटनेच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. अलीकडेच त्याचे कुटुंबीय स्थलांतरीत झाल्याची माहिती मिळाली होती. आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भटुक गोध्रा येथे आला असताना, त्याला सापळा रचून अटक करण्यात आली

गेल्या १९ वर्षांपासून तो फरार होता. एका गुप्त सूचनेनंतर पोलिसांनी सापळा रचून गोध्रा स्थानकाजवळील एका घरातून भटुक याला अटक केली, असे पाटील यांनी सांगितले.

भटुक हा कट रचण्यात, जमावाला भडकवून दंगल घडविणाऱ्या आरोपींपैकी मुख्य आरोपी आहे. रेल्वेचा डबा पेटवण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था देखील त्याने केली होती.तपासादरम्यान नाव समोर आल्यानंतर तो दिल्लीला पळून गेला. त्याच्यावर खून आणि दंगली यासह इतर आरोप आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!