कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक गटामधील राजकारण तापू लागलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा वापर करून १० ते १५ कोटींचा घरफाळा न भरता महापालिकेवर दरोडा टाकला आहे. असा आरोप करत येत्या आठ दिवसात हा घरफळा त्यांनी भरला नाही तर आपण महापालिकेचे दारात उपोषण करणार असल्याचे इशारा भाजप नेते धनंजय महाडिक यांनी आज दिलाय. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केला आहे.
सतेज पाटील यांनी येत्या दहा दिवसात फसवणूक केलेली ही रक्कम दंडासह वसूल करावी. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करु, असा इशारा धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत सतेज पाटील पूर्ण घरफळा भरत नाहीत, तोपर्यंत इतर नागरिकांनी घरफाळा भरून नये, असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
सतेज पाटील सत्तेचा आणि पदाचा वापर करुन हा गैरकारभार केला आहे, असे देखील महाडिक म्हणाले. माझ्या मुलाच्या लग्नावेळी माझ्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातील असून यामागेही पालकमंत्री सतेज पाटील यांचा हात आहे, असा आरोप महाडिक यांनी केला आहे.
दरम्यान या सर्व आरोपासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुर्तास या विषयावर बोलायला नकार दिला आहे. यावर महापालिकेचे पदाधिकारी बोलतील असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याने शिवसैनिकांनी दैनिकाचे कार्यालय फोडले
- ‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी
- औरंगाबाद शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन? जाणून घ्या काय सत्य आहे
- औरंगाबाद लॉकडाऊनबद्दल मनपा आयुक्तांची महत्त्वाची माहिती, म्हणाले..
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

