औरंगाबाद : मुकुंदवाडी भागात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. १७ मे रोजी संतोषीमातानगरातील किराणा दुकानाचे शटर तोडून रोख, दागिने आणि किराणा साहित्य असा ७२ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच चोरांनी पुन्हा एक किराणा दुकान फोडून ६५ हजारांचे साहित्य लांबवले. ही घटना सोहम मोटर्सच्या मागे, कासलीवाल अपार्टमेंट येथे उघडकीस आली.
कैलास ताराचंद मेवाडा (वय ३१, रा. नूतन कॉलनी, क्रांती चौक) यांचे सोहम मोटर्सच्या पाठीमागे असलेल्या कासलीवाल अपार्टमेंट येथे किराणा दुकान आहे. सध्या कोरोनामुळे शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेची आस्थापना या सकाळी अकरा वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे मेवाडा यांनी नेहमीप्रमाणे १९ मे रोजी सकाळी अकरा वाजता दुकान बंद करून घरी गेले.
त्यानंतर मध्यरात्री चोरांनी किराणा दुकानाच्या शटरचे सेंट्रल लॉक तोडून आत प्रवेश केला. दुकानातून काजू, बदाम, तेलाचे पॅकेट असे अन्य किराणा साहित्य मिळून ६५ हजार ५० रुपयांचे ऐवज लांबवला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार कोंडके करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

