पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सभांना, जाहिर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे समजले असून दरवर्षी अत्यंत उत्सवाने, प्रचंड गर्दीने साजरा होणारा १ जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
घरच्या घरी अभिवादन करून हा दिवस साजरा करावा असं आवाहन राज्य सरकारने राज्यभरातील आंबेडकरी अनुयायांना केलं आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर, ब्रिटनमध्ये कोरोनाने रौद्ररूप धारण केलं असून आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्याने केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने देखील वेळीच खबरदारीचं पाऊल उचललं आहे.
त्यामुळेच विजय स्तंभ परिसरात १ जानेवारी रोजी कोणत्याही प्रकारची सभा घेणं, खाद्य पदार्थांची स्टॉल लावून विक्री करणं, पुस्तक विक्रीचे स्टॉल लावणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, भीमा कोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमे व ऑनलाईन पोर्टल मार्फत तसेच दुरदर्शन व इतर वाहीन्यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना वेळोवेळी माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी यंदाच्या वर्षी देखील 7820966966 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सरकारचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठींबा फक्त तोंड देखला आहे – आंबेडकर
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- ‘सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?’
- ‘अजून २५ आमदार असते तर उद्धव ठाकरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते’
- युवकांच्या स्टार्ट-अपसाठी राज्य सरकारचा पुढाकार; तब्बल ‘इतक्या’ लाखांचं देणार अर्थसहाय्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

