Share

निधी मिळाल्याने नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला हिरवा कंदील

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बीड-नगर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने चालु आर्थिक वर्षात ५२७ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. या निधीमुळे नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. या संदर्भात खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची भेट घेऊन त्यांचे विषेश आभार मानले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला.

खासदार मुंडे यांनी रेल्वे मार्गाच्या कामाला निधीची कमतरता भासू नये व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यांमुळे रेल्वे मार्गासाठी केंद्राने ५२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी ५२७ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपये मंजूर केले. केंद्र सरकारने दिलेला निधी आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेला पाठपुरावा रेल्वेच्या कामाला गती देणारा असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांतून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

केंद्र व राज्य सरकारने या रेल्वे प्रकल्पासाठी समान निधी देणे अपेक्षित आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना राज्य सरकारचा निधी मिळत होता त्यामुळे मार्गाच्या कामाला गती मिळाली होती. परंतु, सद्यस्थितीत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून दोन वर्षाच्या काळात रेल्वेच्या कामासाठी निधीच मिळाला नाही. परिणामी, रेल्वे प्रकल्पाच्या कामात अडथळे आले. केंद्राच्या वाट्याचा असलेला अर्धा निधी जवळपास उपलब्ध झाला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचा निधी देणे आवश्यक आहे, असे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले आहे

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!