औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९ झोनमध्ये लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक, युवती विद्यार्थ्यांना कौशल्य विकास साधण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या हेतूने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या प्रकल्पाअंतर्गत महानगर पालिका क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक युवती व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली हा लाईटहाऊस प्रकल्प राबविण्यात येत आहे.
स्टरलाईट टेक्नॉलॉजी या कंपनीने या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत या प्रकल्पासाठी एकूण २०२ जणांनी फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर १५७ जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. फाउंडेशन कौशल्य अभ्यासक्रमासाठी १७५ जणांनी नोंदणी केली आहे. लाईटहाऊसच्या व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमासाठी ९० जणांनी नोंदणी केली आहे. तर या सर्वातून १७ विद्यार्थांना रोजगार मिळाला आहे.
या प्रशिक्षणांचा समावेश
एसी आणि दुरुस्ती, अमेझॉन वेब सेवा, ब्युटी केअर, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रीशियन, आर्थिक लेखा आणि टॅली, फुल स्टॅक डेव्हलपर, जनरल ड्युटी असिस्टंट, ग्राफिक डिझायनिंग, हॉस्पिटल फ्रंट ऑफिस आणि बिलिंग एक्झिक्युटिव्ह, मल्टी स्किलिंग आणि टेक्नॉलॉजी, ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, पायथन, टेलरिंग अद्ययावत आणि मूलभूत या उपक्रमांचा यात समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण ९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मेड फॉर इच अदर’ कपल म्हणत हेमंत ढोमे, क्षितीला चाहत्यांची पसंती
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार ; दिवाळी पहाट कार्यक्रमांचेही आयोजन करता येणार
- समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्याने नवाब मलिकांना धमकीचा फोन
- ‘हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

