Share

आरटीई प्रवेशाला पालकांचा मोठा प्रतिसाद

Published On: 

मुंबई : राज्यभरात ३ मार्चला आरटीई प्रवेशाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये आरटीई प्रवेशाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याचा पालकांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यामध्ये केवळ १३ दिवसांमध्ये तब्बल १ लाख ३६ हजार ६६१ अर्ज प्राप्त झाले आहे. तर पुण्यातून आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक म्हणजेच ३६ हजार ७१४ अर्ज आले आहेत. त्यानंतर नागपूर व ठाणे जिल्ह्यातून देखील अधिक अर्ज करण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्गातून फक्त ९१ अर्ज आले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यासाठी पालकांना https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये आरटीई प्रवेशाला ३५२ शाळांमध्ये ६४६३ जागा आहेत. यामध्ये २९० शाळा एसएससी बोर्डाच्या आहेत. तर ६२ शाळा अन्य बोर्डाच्या आहेत. मुंबईमध्ये प्री प्रायमरी वर्गाच्या ४८२ जागा आहेत. एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये ४१८ तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये ६४ जागा आहेत. तर पहिलीच्या वर्गासाठी एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये ४८०९ तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये ११७२ अशा ५९८१ जागा आहेत. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ९४३१ शाळांमध्ये ९६ हजार ८०१ जागा आहेत. मात्र यासाठी तब्बल १ लाख ३६ हजार ६६१ अर्ज आले. आरटीई अंतर्गत असलेल्या जागांच्या तुलनेत अधिक अर्ज आल्याने आरटीई प्रवेशासाठी चुरस निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!