Share

मुंबईकरांना मोठा दिलासा; कोरोना बाधितांमध्ये घट तर कोरोनामुक्तांची संख्या वाढली !

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. बृहन्मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात गेल्या २४ तासांमध्ये ३ हजार ८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, ९ हजार १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत ७० हजार ३७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईकरांच कौतुक, मात्र अद्यापही संकट बाकी आहे – महापौर पेडणेकर

‘मुंबईत ४ एप्रिल रोजी ११,१६३ रुग्ण सापडले होते. आताचे चित्र पाहिल्यास २५ एप्रिलची आकडेवारी ५,५४२ रुग्ण इतकी आहे. मुंबईकर कोरोना नियमांचं पालन करताहेत. संयम दाखवाताहेत, याचा हा परिणाम आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात, कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे थांबलेला नसला तरी आकडा वाढू नये यासाठी मुंबईकर कटिबद्ध असल्याचं दिसत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

यासोबतच, ‘मुंबईत लॉकडाऊन सुरू आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळं बहुतांश मुंबईकर घरात बसत असल्याचं चित्र दिसतंय. हे चित्र कायम राहिल्यास ‘शाब्बास मुंबईकर’ असं म्हणण्याची वेळ लवकरच येईल, असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!