Share

पुण्यात निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतरही रुग्णसंख्येत घट कायम; ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजारांच्या आत

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

आज पासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. तर, पुणे शहराची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजारांच्या आत आल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा देखील मिळत आहे.

पुणे शहरात आज नव्याने १८७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७४ हजार २९९ इतकी झाली आहे. शहरातील ३१९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६२ हजार ९२९ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या(ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ८८८ रुग्णांपैकी ५०२ रुग्ण गंभीर तर ७९९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आज पासून शिथिल करण्यात आलेले निर्बंध –

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात आले आहेत. आजपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. तसेच, हॉटेल्स आसनक्षमतेच्या ५० टक्के वापरासह रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. तर, नागरिकांनी काळजी घ्यावी, असं अजित पवार यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!