नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत राम मंदिर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशावेळी हा कथित गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि प्रवर्तन निदेशनालयाने करण्याची मागणी केली आहे. इतक्या कमी वेळात या जमिनीची किंमत इतकी जास्त कशी काय वाढू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही याच प्रकारचा आरोप केला आहे.
राजनीतिक विद्वेष से प्रेरित लोग ज़मीन ख़रीद के सम्बंध में समाज को गुमराह करने के लिए भ्रामक प्रचार कर रहें हैं। pic.twitter.com/jfENrubyOp
— Champat Rai (@ChampatRaiVHP) June 13, 2021
संजय सिंह यांनी केलेले हे आरोप मात्र राम मंदिर ट्रस्टने फेटाळून लावले आहेत. ‘वास्तूशास्त्रानुसार या मंदिराच्या आसपास काही इतर मंदिरे आणि निवासस्थाने बांधण्याची गरज आहे आणि त्यासाठी ज्यांची घरे खरेदी करण्यात आली आहेत त्यांना पुनर्सवसनासाठी जमीन दिली जाणार असल्याचे ट्रस्टने सांगितले आहे. राम मंदिरासाठी खरेदी केलेला सदर भूखंड हा बाजारभावानेच खरेदी करण्यात आला आहे, मात्र काही लोक राजकीय द्वेषामुळे त्याबाबत गैरसमज पसरवत आहेत असे ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतरही रुग्णसंख्येत घट कायम; ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजारांच्या आत
- कडकनाथ रिटर्न्स ? रोहित पवारांवर आणि बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याने केले गंभीर आरोप
- ‘सॉफ्ट सिग्नलचा नियम आयसीसीने रद्द करावा’, स्टुअर्ट ब्रॉडने केली मागणी
- आमदार पेप्सी खायला वेळ देतात पण पोल्ट्री मधील शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही
- राज्यकर्त्यांना देशाची फाळणी करायचीये; उदयनराजेंचा गंभीर आरोप


