मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात थकीत वीज बिलासंदर्भातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट देण्यात आली असून शेतकऱ्यांनी ऊर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास त्यांना राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी देण्यात येईल महाविकास आघाडी सरकारच्यावतीने ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या जवळपास ६६ टक्के, म्हणजे ३० हजार ४११ कोटी रूपये इतकी रक्कम माफ केली जाणार आहे.
ही योजना राबविण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार ५०० कोटी रुपये निधी भागभांडवलाच्या स्वरुपात देण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली. त्याचसोबत पैसे भरूनही ज्यांना अद्यापपर्यंत कृषीपंप वीज जोडणी मिळाली नाही, अशा शेतकरी अर्जदारांना पारंपारिक अथवा सौर कृषीपंपाच्या माध्यमातून वीज जोडणी देण्याकरीता कृषीपंप वीज जोडणी धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना राबविण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार ५०० कोटी रुपये निधी भागभांडवलाच्या स्वरुपात देण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प; राम सातपुतेंची टीका
- #Maharashtrabudget2021: यंदाच्या अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले?
- विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे; आठवले घेणार मोदींची भेट
- यंदाच्या अर्थसंकल्पात जीर्ण शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद
- राज्यात दारु महागणार! अर्थसंकल्पात अजित पवारांनी वाढवला कर


