Share

राज्यात दारु महागणार! अर्थसंकल्पात अजित पवारांनी वाढवला कर

Published On: 

औरंगाबाद : यंदाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी दारू महाग केली आहे. यामुळे शासनाला तब्बल १ हजार कोटींचा महसूल मिळणार आहे. आधीच्या उत्पादन शुल्क दरा पेक्षा यंदाच्या बजेट मध्ये दर वाढवण्यात आले आहे. त्याचा संदर्भ महिलांसाठी घर खरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर केल्यावर मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यामुळे १ हजार कोटींची तुट भरून काढण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना, देशी ब्रॅण्डेड मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर, निर्मितीच्या मुल्याच्या २२० टक्के अथवा प्रत्येक प्रुफ लिटरच्या मागे १८७ रुपये या पैकी ज्याचे दर जास्त असतील ती लावण्याचे प्रस्तावित केले आहे.

तसेच, मद्यावर मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ‘ख’ नुसार ६० टक्के मूल्यवर्धित करामध्ये वाढ करून त्याला आता ६५ टक्के करण्यात आले आहे. तसेच मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१ (५) नुसार मद्यावर ३५ टक्क्यावरून ४० टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे विदेशी दारूच्या दरामध्ये ७ ते १० रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.

या शुल्क वाढीमुळे शासनाच्या तिजोरीत तब्बल १ हजार कोटी रुपयांची भर होणार आहे. तर, तज्ञांच्या मते महिलांसाठी खास मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने तिथे सरकारच्या तिजोरीतून १ हजार कोटींची कपात होण्याची शक्यता असल्याने, ती भरून काढण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याचे मत व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!