मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मांडला आहे. कोरोना महामारीच्या संसर्गाचा सरकारच्या तिजोरीवर चांगलाच परिणाम झाला आहे. यामुळे राज्याला खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य सरकार काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरला आहे. राज्य अर्थसंकल्पामध्ये जीर्ण शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद करण्याची अर्थमंत्री अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी मोठी तरदूत केलेली आहे. त्याबद्दल माहिती देताना पवार यांनी सांगितले की, मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी. ‘बर्ड फ्लू’सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार आहे. जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी या अर्थसंकल्पात दिलेली आहे. तसेच युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार अआहे. अशी महत्वपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- उस्मानाबाद, परभणीत मेडिकल कॉलेज, मराठवाड्याची मागणी पूर्ण
- मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा
- औरंगाबादेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनव आंदोलन
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू


