Share

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मोठा दिलासा; उमेदवारीला आव्हान देणारी याचिका फेटाळली!

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. साध्वीला निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका एनआयए न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

2008मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सैय्यद अहमन याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सैय्यदचे वडिल बिलाल निसार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत मुंबईच्या NIA कोर्टात साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली होती. पण ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली.

यावर निर्णय देताना न्यायालयानं न्यायायलय देशातील कोणत्याही नागरिकाला निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. शिवाय, आरोपीला शिक्षा देखील झालेली नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं आता साध्वी प्रज्ञासिंह यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!