Share

गँगस्टर अरूण गवळी झाले आजोबा; अक्षय-योगितला कन्यारत्न प्राप्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गँगस्टर अरूण गवळी अर्थात ‘डॅडी’ हे आजोबा झाले आहे. अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी मागील वर्षी ८ मे रोजी विवाह केला होता. योगिता ही अरुण गवळीची मुलगी आहे,  तर अभिनेता अक्षय वाघमारे याने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगीरी, बस स्टॉप या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नाच्या या वर्षपूर्तीला त्यांनी ही गोड बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झालंचे अक्षयने सोशल मीडियावर सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/COk4k0fBHsQ/?igshid=15ke1cirj3vqo

अक्षयने ही गोड बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली असून तो म्हणाला की, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत’.

पुढे बोलताना तो म्हणाला, ‘आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडले आहे’. यानिमित्त अक्षय आणि योगिताच्या चाहत्यांनी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!