Share

नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या

Published On: 

अहमदनगर: उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव – वडघुल या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली आहे.

झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुन उडी घेऊन 24 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली होती त्या धबधब्यावरील घटनास्थळी गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती मात्र आठ दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू होता.

दरम्यान खांडगाव – वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासाला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणातील उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यातील संभाषण संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीत असलेल्या दिडशे घरांची नियमबाह्य नोंद करण्यासाठी घोडके ग्रामसेवक झुंबर यांच्यावर दबाव टाकत होते. तर गवांदे यांच्या विरोधात घोडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तक्रर मागे घ्यायची असेल तर ही कामे करा असे संभाषण आहे. त्यामुळे या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!