🕒 1 min read
तुळजापूर- तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या जळकोट येथील ग्रामपंचायतवरील वीस वर्षाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे प्रणित बहुजन महाविकासआघाडीने उलथवली आहे.
बहुजन महाविकास आघाडी पॅनेलने विजय मिळवताच जळकोट येथे जेसीबीने गुलाल उधळुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना, मनसे कार्यकत्यांनी ऐकच जल्लोष केला.
या विजयाचे शिल्पकार ठरले ते पँनल,प्रमुख काँग्रेसचे अशोक पाटील, जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, मनसेचे प्रशांत नवगिरे, सेनेचे कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे महेश कदम, तसेच गजेंद्र पाटील, यशवंत पाटील. या सर्वांनी एकत्र येत सत्ता उलथवली .
येथील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत वर वीस वर्षापासून माजी जि.प.सदस्य गणेश सोनटकेची सत्ता होती माञ मागील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी विजय मिळवून ताबा घेतला. नंतर ग्रामपंचायत निवडणुक लागली यात काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेना मनसे यांनी ऐकञित येत बहुजन महाविकासआघाडी स्थापन करुन विजय मिळवून सोनटक्केचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.
महत्वाच्या बातम्या
- व्हाइट हाऊस मधून बाहेर पडताच चीनचा ट्रम्प यांना मोठा झटका
- मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- वरिष्ठांच्या त्रासाला वैतागून विष घेतलेल्या ग्रामसेवक शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
- ‘बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्या लेखक भालचंद्र नेमाडे यांना अटक करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
