औरंगाबाद : पैठण पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून बिडकीनचे ग्रामसेवक संजय शिंदे यांनी मंगळवारी विष प्राशन केले होते. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणावरून ग्रामसेवक संघटना संतप्त झाल्या आहेत. संघटनेने आजपासून जिल्हाभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे.
पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी १८ जानेवारीला बिडकीन ग्रामपंचायतीची तपासणी केली. तेव्हापासून ग्रामसेवक संजय शिंदे हे तणावात दिसून आले होते. लगेच दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी ९.३० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे ग्रामसेवक संतप्त झाले आहेत. पंचायत समिती प्रशासनाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे.
दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांची भेट घेवून पैठणचे गटविकास अधिकारी कसा त्रास देत आहेत हे सांगितले. पैठण येथील गटविकास अधिकारी व्ही.डी.लोंढे हे वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास, आराखडे मंजूर करण्यासाठी चौकशी करतात, पैसे दिल्याशिवाय बॅंकेतून पैसे काढण्याचे आदेश देत नाहीत. तसेच आर्थिक मागणी पूर्ण न केल्यास काही ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामसेवक दहशतीखाली काम करत असुन त्यांचा पदभार काढून त्यांची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दुसऱ्या टप्प्यात लस !
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

