तुळजापूर – बंजारा समाजा बद्दल वादग्रस्त अश्लील लिखाण करणाऱ्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कांदबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वर त्वरित गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुळजापूर तालुक्यातील समस्त बंजारा समाजाने पोलिस खात्याला निवेदन देवुन दिला आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कांदबरीत लेखक भालचंद्र नेमाडे यांनी अत्यंत खालची पातळीची भाषा वापरुन चरित्र हनन केले आहे यामुळे देशातील बारा कोटी व राज्यातील १कोटी ५लाख बंजारा समाजाचा भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणाचे गाभीर्य पाहुन लेखक भालचंद्र नेमाडेवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अन्यथा बंजारा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वजा निवेदन जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण,राजु चव्हाण, लक्षमन राठोड, गोविंद राठोड, वसंत चव्हाण, लखन चव्हाण, कुमार राठोड, राहुल राठोड,उत्तम राठोड, नामदेव पवार अदिंनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- व्हाइट हाऊस मधून बाहेर पडताच चीनचा ट्रम्प यांना मोठा झटका
- मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- वरिष्ठांच्या त्रासाला वैतागून विष घेतलेल्या ग्रामसेवक शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

