Share

व्हाइट हाऊस मधून बाहेर पडताच चीनचा ट्रम्प यांना मोठा झटका

Published On: 

नवी दिल्ली : व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला असंख्य मान्यवर उपस्थित होते.

मात्र, डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार होताच चीननं ट्रम्प यांच्या टीममधील २८ जणांना मोठा झटका दिला. चीननं २८ जणांसाठी चीनने द्वार बंद केले असून, त्यांच्यावर चीनसह हॉगकाँग आणि मकाऊमध्येही बंदी घालण्यात आली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी बुधवारी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. “मागील काही वर्षांपासून अमेरिकेत काही चीनविरोधी स्वार्थी नेत्यांनी आपल्या राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी चीनविरोधात पूर्वग्रह दूषितपणातून अमेरिका आणि चीनमधील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं. अमेरिकेतील नेत्यांनी नियोजनबद्धरीत्या अशी पावलं उचलली ज्यामुळे चीनच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप होत होता.

या पावलांमुळे चिनी नागरिक अपमानित झाले आणि अमेरिका-चीन संबंधांचं नुकसानही झालं. चीन सरकार देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितांचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असं सांगत चीनने ट्रम्प यांच्या टीममधील २८ जणांवर बंदी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!