🕒 1 min read
मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण अध्यादेश ठाकरे सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालायत हे प्रकरण असल्याच सांगत राज्यपालांनी राज्य सरकारकडे कायदेशीर खुलासा मागितल्याची माहिती समोर आली आहे. या अध्यादेशावर राज्यपालांनी शंका उपस्थित केली असून राज्य सरकारला कायदेशीर खुलासा करण्यास सांगितले आहे.
यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘भाजप हा ओबीसींच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकारी विरोधात आहे. त्याचा प्रत्यय आता येत आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी निवडणुकीतील आरक्षणासाठी अध्यादेश काढला. पण राज्यपाल कोश्यारींनी त्यात शंका उपस्थित केली आणि तो परत पाठवला. हा भाजपचा डाव आहे असा आरोप पटोले यांनी केला.
ओबीसी समाजाचा वाढता दबाव लक्षात घेता ठाकरे सरकारने ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता. आता तो सहीसाठी राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. पण राज्यपाल यांनी राज्य सरकारकडे खुलासा मागितला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये ‘लेटर वॉर’
राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असे निर्देश देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपालानी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राऊत माझे मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत जास्त करावी’, चंद्रकांत पाटलांचा खोचक सल्ला’
- ‘५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होऊ शकतात, तर मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?’
- राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- ‘लायकीनुसार नुकसानीची किंमत ठरते मग राऊतांची किंमत सव्वा रुपया’; निलेश राणेंची टीका
- ‘संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर ठोकणार सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

