Share

“राज्यपालांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत, अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय”, धनंजय मुंडेंची टीका

Published On: 

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरूनच त्यांच्यावर टीका केली जात आहे. तर आता यावरच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही संताप व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटले की, “राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राची जनता माहीत नाही. महाराष्ट्राचे संसदीय कामकाज आणि नियम माहीत नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत. त्यांना अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय. एवढंच नाही तर त्यांना देशाचे राष्ट्रगीतही नकोय. त्यांनी केलेलं कृत्य आजपर्यंत देशाच्या संसदीय कामात कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही.”

तसेच राज्यपालांचे अभिभाषण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा महत्वाचा गाभा असतो. राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा लक्षात येते. राज्यपालांनी अभिभाषण न करता ते पटलावर ठेवलं, भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अभिभाषण न करता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!