मुंबई : शाहरुख खान आणि आमिर खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमातून त्यांची जोडी २५ वर्षांत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा सीन खुद्द आमिर खानने दिग्दर्शित केला आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आमिर खानचा हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चे हिंदी रूपांतर आहे. या हॉलिवूड चित्रपटात टॉम हँक्सची मुख्य भूमिका होती. अद्वैत चंदन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात आमिर खान, शाहरुख खान आणि करीना कपूर हे मुख्य कलाकार आहेत. दोन्ही खान एकत्र काम करताना लोकांना आवडेल, असा अंदाज या चित्रपटाबद्दल आधीच वर्तवला जात आहे.
किंग खानच्या विनोदी बुद्धीची चर्चा
शाहरुख खानला Ask Me Anything या कार्यक्रमाच्या सेशनमध्ये त्याच्या पठाण या नवीन चित्रपटाविषयी खूप प्रश्न विचारण्यात आले, त्यामधील एक प्रश्न अमिर खानच्या लाल सिंह चढ्ढा बाबत विचारण्यात आला. त्याचे खूप मजेशीर उत्तर किंग खानने दिले.
चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर उत्तर
एक चाहत्याने किंग खानला विचारले लालसिंह चढ्ढा पहिला का? याला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, “अरे आमीर म्हणतो आधी पठाण दाखवा”. शाहरुखचे हे उत्तर ऐकून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आले असेल. शाहरुखचे आणखी एक उत्तर तुमचे मन जिंकेल. एका चाहत्याने विचारले- पठाण तुमच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असे तुम्हाला वाटते का? किंग खानने उत्तर दिले की “तुम्ही थोडे अॅडजस्ट करा मी थोडे अॅडजस्ट करेल. मग सर्व आशा पूर्ण होतील.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

