मुंबई: ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी अहवाल नसल्याचं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या अहवलाता नमुद केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा धक्का असून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जाणून बूजून ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकारण संपुष्टात आणायचं आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. तसेच या प्रस्तापितांना यांच्या जवळचे बगलबच्चे ओबीसींच्या जागांवर बसवायचे आहेत म्हणून गेल्या दोन वर्षांपासून जाणूनबूजून प्री प्लान करुन ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण संपवण्याचा कट या सरकारने रचला आहे, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
विराटच्या अंडर १९ संघाच्या कोचचा खुलासा “विराटला आयपीएलच्या पहिल्या कमाईतुन…”
OBC Reservation : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले…
‘दाऊदला समर्थन देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे’ – देवेंद्र फडणवीस
OBC Reservation : “…तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती”, राम सातपुतेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

