मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यवरून आज पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार विरोध केला आहे. तसेच भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त औरंगाबाद येथे बोलताना शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी त्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला होता. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील राज्यपालांना जोरदार विरोध करण्यात आला.
विधीमंडळाच्या सभागृहाला मार्गदर्शन न करता राज्यपाल निघून गेले, तसेच राष्ट्रगीतही पूर्ण न करता राज्यपाल येथून निघून गेले, हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी राज्यपालांचा निषेध करतेय, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
OBC Reservation : “ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला आमचा तीव्र विरोध”, फडणवीसांचा इशारा
Breaking News : सुप्रीम कोर्टाने नाकारला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल
State Budget Session 2022 : “बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात अशा मंत्र्याला…”, फडणवीस आक्रमक
युक्रेनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मुंबईत रावसाहेब दानवेंनी केले स्वागत


