Share

“भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले”, जयंत पाटलांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे. भाजपच्या आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. आम्हीही विरोधी पक्षात होतो पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही.”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला, फलकं झळकवली त्यामुळे राज्यपाल महोदय राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे. असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या  :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!