🕒 1 min read
मुंबई- उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. हाथरसमध्ये घडलेल्या प्रकारामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याच्या मागणी देखील केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चांडपा गावात १९ वर्षाच्या युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा निषेध व्यक्त करणारे पत्र दिले.
आरोपी असलेल्या नराधमांना फाशीची कठोर शिक्षा व्हावी अशी शिफारस उत्तर प्रदेश सरकारला करावी व पीडितेच्या परिवारास महाराष्ट्र शासनाने २५ लक्ष रुपयांची आर्थिक मदत करावी अशी विनंतीही या पत्राद्वारे गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत व त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल असे गजभिये यांना सांगून आश्वस्त केले. याच आशयाचे निवेदन गजभिये यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही दिले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकरणात अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की, उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा संपूर्णत: नाश निश्चित आहे. या दोषींना अशाप्रकारे दंड मिळेल की भविष्यात ते उदाहरण म्हणून दाखवलं जाईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हरभजन-रैनाला चेन्नई जोरदार दणका देण्याच्या तयारीत
- शिवसेनेचा वचननामा ही तर जनतेची फसवणूक : आपची पोलिसात तक्रार
- #हाथरस प्रकरणी अखेर योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन, म्हणाले…
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

