🕒 1 min read
नवी दिल्ली- यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमला संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग) हे दोन दिग्गज खेळाडू नसल्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.
सुरेश रैना चेन्नईच्या संघासोबत यूएईला गेला होता. या ठिकाणी सीएसकेचे 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रैनाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांवर हल्ला झाल्याने आपण माघार घेतल्याचे रैनाने नंतर स्पष्ट केले. तर भज्जीने देखील स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपले नाव मागे घेतले.
यानंतर सीएसकेने या दोघांचे नाव आपल्या अधिकृत वेबसाईटवरून हटवले. तसेच सीएसके या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याच्या तयारीत आहे, असे वृत्त ‘इनसाइड स्पोर्ट’ने दिले आहे. चेन्नईने रैनाला 11 कोटी आणि भज्जीचा 2 कोटींना खरेदी केले होते.
आयपीएल लिलाव निर्देशांनुसार २०१८ साली हरभजन आणि रैना यांचा तीन वर्षांसाठी सीएसकेसोबत करार झाला होता. हा करार २०२० साली संपुष्टात येणार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसकेने आता अधिकृतपणे दोन्ही खेळाडूंसोबतचा करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता या दोन्ही खेळाडूंना यंदाचे वेतन मिळणार नाही. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही सांगितले होते की, खेळाडूंना वेतन तेव्हाच मिळेल, जेव्हा ते खेळतील.दरम्यान, पुढील वर्षी वेळेच्या कमतरतेमुळे बीसीसीआय कदाचित खेळाडूंचा लिलाव आयोजित करणार नाही आणि अशा परिस्थितीत रैना आणि हरभजन यांचा सीएसकेसोबत कोणताही करार राहणार नाही. त्यामुळे त्यांना पुढील आयपीएल सत्रापासूनही दूर रहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- अनुराग कश्यप म्हणाला मी ‘तेव्हा’ भारतात नव्हतोच; पायलने दिले सणसणीत उत्तर
- शिवसेनेचा वचननामा ही तर जनतेची फसवणूक : आपची पोलिसात तक्रार
- दिलासादायक : कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये भारत जगामध्ये अव्वल
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
