🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांचे विधानसभा निवडणूकीचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणीपूरमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस देखील भुईसपाट झाले आहे. विरोधी पक्ष यावर आत्मचिंतन करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या खासदाराने मोठं विधान केले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने निर्माण केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं, असे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काल (१० मार्च) सायंकाळी एका चर्चासत्रात बोलत असतांना कुमार केतकर म्हणाले, “महाराष्ट्राचे सरकार कुठल्याही क्षणी सरकार जाऊ शकते. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सरकार स्थापन झालं. तेव्हापासून मी सांगत आहे. हे सरकार पडेल. ते विविध यंत्रणांचा वापर करत नाहीत. ते प्रमाणिक लोक आहेत ते कोणाच्या घरी छापे टाकत नाहीत. उदाहरणार्थ नारायण राणे आहेत. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. म्हणजे आपण आत्ता बोलतोय ना तिकडे सरकारला सुरुंग लावण्याची तयारी सुरु झालेली असेल, असेही कुमार केतकर म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भाजपचे प्रत्येक वक्तव्य वादग्रस्त होतं असं सांगत २०१४ मध्ये युती तोडून वेगवगेळं कोण लढलं?,’ असा सवाल केतकरांनी केला. तसेच साधनसुचितेने भाजप काम करते, असेही केतकर म्हणाले.
यापूर्वी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील १० मार्चनंतर सरकार पडेल, असे वक्तव्य केले होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असं भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
