मुंबई: महेंद्रसिंग धोनी, कपिल देव यांसारख्या क्रिकेटपटूंवर बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्यात आले आहेत. यासोबतच आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचे नाव जोडले गेले आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे नाव आहे ‘कौन प्रवीण तांबे’. त्याचबरोबर आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. श्रेयस तळपदे या चित्रपटात क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांची भूमिका साकारत असून त्याची दमदार शैलीही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.
कोण आहे प्रवीण तांबे?
प्रवीण तांबेचा (pravin tambe) जन्म ८ जून १९७१ रोजी झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. तो ४१ वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा राजस्थान रॉयल्ससाठी मैदानात प्रवेश केला होता. राजस्थान रॉयल्सनेही (rajasthan royals) या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयपीएलपूर्वी प्रवीण तांबे याला प्रथम श्रेणीत संधी मिळाली नव्हती. येणारा चित्रपट त्याच्या संघर्षाचा पुरावा आहे. प्रवीण तांबे खेळाडू म्हणून IPL खेळत नाहीये. तो कोलकाता संघाच्या संघ व्यवस्थापनाचा भाग आहे.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1501774978928504834?s=20&t=BWDZsMDguBHtJHyGwTfxWg
‘कौन प्रवीण तांबे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रदा देसाई यांनी केले आहे. चित्रपटात प्रवीणच्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे त्याची भूमिका साकारत आहे. शिवाय आशिष विद्यार्थी, परमब्रत चॅटर्जी आणि अंजली पाटील हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट १ एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- …हा विजय मिळवण्यामध्ये महाराष्ट्राच्या सेनेचा मोठा हात- देवेंद्र फडणवीस
- “गेली ५० वर्ष आम्ही मुंबई पालिका लढतोय इथे भगवा कायम राहणार”, राऊतांचा इशारा
- सिद्धू निवडणुकीत पराभूत होताच ‘अर्चना पूरण सिंह’ यांची खुर्ची धोक्यात? हे मजेदार मीम्स होत आहेत व्हायरल…
- “काहींना इतकी मळमळ आहे की…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
- गंभीर प्रश्नांकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप!


