Share

‘सरकार मालमत्ता विक्रीत व्यस्त, तुम्हीच तुमची काळजी घ्या’, राहुल गांधींचे देशवासियांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज देशात ४६ हजार १६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ६०७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही ३,२५,५८,५३० वर पोहोचली आहे, तसेच मृत्यूंची संख्या ४,३६,३६५ वर पोहोचली आहे. सध्या देशात ३,३३,७२५ सक्रीय रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून आपल्या ट्विट च्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की,’सध्या केंद्र सरकार हे मालमत्ता विकण्यात व्यस्त आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तसेच देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. कृपया सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, कारण केंद्र सरकार तर फक्त मालमत्ता विकण्यात व्यस्त आहे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्राने नुकताच एक नॅशनल मॉनिटायझेश प्लॅन जाहीर केला आहे. ज्यामध्ये खाजगी क्षेत्राशी संलग्न होऊन ६ कोटी रुपयांची मालमत्ता भाडेतत्वावर देऊन कमाई केली जाईल. त्यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये केलेली देशातील कमाई भाजप सरकार विकत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. परंतु, ही मालमत्ता विकत नसून फक्त भाडेतत्वावर देणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामधून मिळालेल्या पैशाने देशाचा विकास केला जाईल, असेही केंद्र सरकारने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!