Share

Tanushree Dutta | गाडीचे ब्रेक फेल करून, विष पाजण्याचा प्रयत्न करून अन्…; तनुश्री दत्ता ने केला खळबळजनक खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तनुश्री दत्ता देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्यांची बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ओळख कमी होत चालली आहे. तनुश्री, नाना पाटेकरांवर अनेक आरोप करत असल्याने चर्चेत आहे. भारतात MeToo चळवळ सुरू करण्याचे सर्व श्रेय तनुश्री दत्ताला दिले जाते. 2020 मध्ये, एका चित्रपटाच्या सेटवर लैंगिक छळाबद्दल ती उघडपणे बोलली, त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्या सोबत झालेल्या गैरवर्तनाचा खुलासा केला. तिच्या या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलल्यानंतर आता तनुश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर, तिने दावा केला आहे की, तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल उघडपणे बोलल्यानंतर तिला मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले.

अलीकडेच एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने खुलासा केला होता की, ‘मी उज्जैनमध्ये असताना माझ्या गाडीच्या ब्रेकला एक-दोन वेळा छेडछाड करण्यात आली होती. त्यानंतर माझा खूप वाईट अपघातही झाला. त्यात मी थोड्याने वाचले. या अपघातातील माझ्या दुखापती पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागला.

हाच मुद्दा पुढे नेत तनुश्रीने असेही सांगितले की तिला विश्वास आहे की तिला अनेकदा विष देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तनुश्री म्हणाली, ‘माझी एक मोलकरीण होती, जी माझ्या घरात काम करायची. ती आल्याननंतर मी हळूहळू आजारी पडू लागले. तेव्हाच मला माझ्या पाण्यात काहीतरी मिसळले जात असल्याचा संशय येत होता. या वर्षाच्या सुरुवातीला तनुश्रीने सोशल मीडियावर दावा केला होता की ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत इंटीमेट सीन देऊन चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. यापूर्वीही तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट केली होती. तनुश्री दत्ताने लिहिले की, “तुम्ही पाहिले आहे की सर्व अत्याचार करणारे बॉलीवूड माफिया एकतर अविवाहित आहेत किंवा घटस्फोटित आहेत? खूप कमी आहेत जे अद्याप विवाहित आहेत, परंतु ते देखील दुःखी आहेत. त्यांचे जोडीदार आणि मुले त्यांचा तिरस्कार करतात. कोणीही एक चांगली महिला त्यांच्यासोबत राहत नाही. कारण पुरुषांना त्यांच्याशी कसे चांगले वागावे हे माहित नाही.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!