Share

‘पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त’ ; पडळकरांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. ‘राज्यात पूरपरिस्थिती आहे. लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे,’ अशी घणाघाती टीका भाजपचे नेते व विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी सवांद साधला यावेळी त्यांनी हे टीकास्त्र डागले आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले कि, ‘महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका पडळकर यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!