🕒 1 min read
मुंबई: राज्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत राज्यावर संकट कोसळले असताना केंद्राने राज्याला मोठी मदत केली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांसाठी केंद्राने ७०१ कोटींचा निधी दिला असल्याचे राज्याचे माजी कृषिमंत्री तसेच विधानपरिषदेतील आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
सदाभाऊ यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. सोबतच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचेही ७०१ कोटी दिल्याबद्दल आभार मानले आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनासाठी ७०१ कोटी रुपये इतका मदतनिधी जाहीर केल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय कृषीमंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमार साहेब यांचे मनःपूर्वक आभार!#MaharashtraFloods pic.twitter.com/jlTY7sYZhT
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 28, 2021
राज्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजार घरे पुरामुळे बाधित झाली आहेत. तर राज्यातील रस्ते, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याला नव्याने उभारणीसाठी अनेक राजकीय पक्षांनी निधी जमा केला आहे. राष्ट्रवादीकडून २ कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. तर अनेक खासदार, आमदार तसेच नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी दिला आहे. आता केंद्राकडून सर्वाधिक ७०१ कोटींची मदत दिल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या उभारणीत याचे मोठेच योगदान असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कृणाल पांड्या कोरोनाबाधित आढळल्याने शास्त्री-कोहली यांच्या चिंतेत वाढ
- दिलासादायक! कोरोनाबाधीत कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह
- अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्यासाठी प्रयत्न : अजित पवार
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
