टीम महाराष्ट्र देशा – विखे – पवार या घराण्यातील वाद महाराष्ट्राला माहिती आहे. त्यातच आता राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका करताने भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणाले की, ‘सत्तेच्या सारीपाठात सामान्य माणसाचे जीव चालले आहेत. राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत. मात्र, गृहखातं ठप्प झाले असून रिमोट कंट्रोलने जर राज्य चालणार असेल तर राज्याची अधोगतीच होणार, असा टोला राधाकृष्ण विखे पाटीलनी यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली.
तसेच युतीत असताना शिवसेनेची भूमिका वेगळी होती. मात्र आता केवळ सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेची भूमिका बदलली आहे. घुसखोरांना हाकला ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. आपल्या धोरणांनाच बगल देण्याचे आता शिवसेनेचे काम असून बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आपण का घाबरतो, असा सवालही राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित कार्तानेच, मतांच्या झोळ्या भरण्यासाठी देश वेठीस धरण्याचे काम सध्या सुरू आहे. यात शिवसेना सहभागी असणं दुर्दैवी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हटलं आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

