मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलेल्या सॅम डिसोझा यांनी आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज जप्त न केल्याचा दावा केला आहे. तसेच किरण गोसावी यांना पैशांचा व्यवहार करायचा होता असेही यावेळी सॅम यांनी सांगितले आहे.
सोमवारी माध्यमांशी संवाद साधतांना डिसोझा म्हणाले की,’एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची या कथित डीलमध्ये कोणतीही भूमिका नव्हती आणि गोसावी यांनी केवळ त्यांच्या संपर्कात असल्याचे नाटक केले होते. किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असल्याचे लक्षात आल्यानंतर गोसावीला पैसे परत केले. तसेच पुढे डिसोझा यांनी सांगितले की, ‘आम्ही तीन ऑक्टोबरच्या पहाटे ददलानी आणि गोसावी यांच्यात डील करण्यासाठी एकत्र भेटले होतो. ददलानी, तिचे पती, गोसावी, मी आणि इतर काही जण तीन ऑक्टोबरला पहाटे चारच्या सुमारास लोअर परेल येथे भेटलो. त्यानंतर मी तेथून निघून गेलो आणि नंतर गोसावीने आर्यनला मदत करण्यासाठी दादलानीकडून ५० लाख रुपये घेतले होते अशी माहिती मला मिळाली.’
दरम्यान, लोअर परळमधील भेटीदरम्यान गोसावीला फोन आला आणि त्यावर समीर सर असा कॉलर आयडी दाखवत होता. पण गोसावीने त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता आणि डील करताना आपण वानखेडे यांच्याशी बोलत असल्याचे त्याने दाखवले. किरण गोसावीचा खोटेपणा माझ्या नंतर लक्षात आला. कारण त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता आणि ट्रू कॉलरवर मला ते दिसले. या भेटीनंतर काही तासांतच गोसावीवर दबाव आणून पैसे परत दिल्याची मी खात्री केली, असा दावाही यावेळी डिसोझा यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

