मुंबई: नुकतीच पाच पैकी चार राज्यांत भाजपची सत्ता आली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीची चर्चा तर देशभरात होती. मुख्यमंत्री योगींची लाट उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. मोदींची लाट कायम राहिली हे या निकालावरून स्पष्ट झाले. परंतु या सगळ्यात “आप”चे अरविंद केजरीवाल मात्र एक वेगळी छाप सोडून गेले. यानंतर आता दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाकीत केलेला एक जुना व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे. “आपचा ताप आम्हाला नाही, काँग्रेसला होणार. काँग्रेस जिथं कमी होईल तिथं आप वाढेल.” असे मुंडे म्हणाले होते.
केजरीवाल कुणाला संपवणार
गोपीनाथ मुंडे या व्हिडिओत म्हणत आहेत कि, अरविंद केजरीवाल यांच्या आपनं दिल्लीत तीन वेळेस सत्ता मिळवली. अण्णा हजारेंनी मनमोहनसिंग सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं. भ्रष्टाचारविरोधी हे आंदोलन बघता बघता देशभर पसरलं. काँग्रेसची दशकभराची सत्ता संपली. नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. अभूतपुर्व अशा बहुमतासह मोदी देशाचे पंतप्रधान झाले. अण्णांच्याच आंदोलनातून काही नेतेही जन्माला आले. त्यापैकीच एक होते अरविंद केजरीवाल. त्यावेळेस काँग्रेसचे नेते केजरीवालांना निवडणुका का लढत नाहीत म्हणून खिजवायचे. आणि त्याचा उलटा परिणाम झाला.
केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. त्यानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. केंद्रात मोदी असल्यामुळे सगळ्यांना वाटलं दिल्ली विधानसभेतही भाजपचच सरकार येणार. पण दिल्लीकर चतूर निघाले त्यांनी केंद्रात मोदींना ठेवलं तर दिल्ली केजरीवालांच्या हाती दिली. काँग्रेसच्या शीला दीक्षित यांची संधी संपली. काँग्रेसचीही संपली. त्याच काळात केजरीवाल कुणाला संपवणार अशी चर्चा सुरु झाली? पण आपचा त्रास भाजपाला होणार नाही, आपचा ताप काँग्रेसला होईल. आपचा ताप आम्हाला नाही, काँग्रेसला होणार. काँग्रेस जिथं कमी होईल तिथं आप वाढेल. ते आम्हाला घटवू शकणार नाहीत, असेही मुंडे या मुलाखतीच्या व्हिडिओत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

