Share

आरोग्य खात्यातील परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा आम्ही…- गोपीचंद पडळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यात आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात मोठे वादंग सुरु आहे. पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर आली आहे. आरोग्य खात्यातील परीक्षेचा पेपर फुटल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पेपर फुटी प्रकरणाची तातडीने न्यायालयीन चौकशी करा. सोबतच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही चौकशी करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आरोग्य विभागातील घोटाळ्याला आघाडी सरकारचेच अभय होते का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचेच अभय होते का? असा सवाल उपस्थित होतोय, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!