मुंबई : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. मात्र नंतर काही वेळात जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे यांच्यावर हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली होती. तर काँग्रेस नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे महाविकास आघाडीमध्येच एकवाक्यता नसल्याची टीका भाजप नेत्यांनी केली.
मा. सोनिया गांधींनी #मोफत लसीकरण' द्या अशी भूमिका घेतलीये. त्यांच्याच पक्षाचे पण न ऐकणारे #महाविकास_आघाडीचे मंत्री सत्ता लालसेमुळे नांग्या टाकून बसलेत. असे बोलघेवडे @INCMaharashtra मंत्री कधी पाहिले नाहीत, एवढी दयनीय अवस्था कधी गांधी परिवारावर कुणीही आणली नसेल.
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) April 27, 2021
आता, भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस मंत्र्यांवर खोचक टीका केली आहे. ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मोफत लसीकरण द्या अशी भूमिका घेतलीये. त्यांच्याच पक्षाचे पण न ऐकणारे महाविकास आघाडीचे मंत्री सत्ता लालसेमुळे नांग्या टाकून बसलेत. असे बोलघेवडे काँग्रेस मंत्री कधी पाहिले नाहीत, एवढी दयनीय अवस्था कधी गांधी परिवारावर कुणीही आणली नसेल.’ असा प्रहार पडळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासा कायम : पुण्यात आजही नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक !
- आनंदाची बातमी! रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’ १ मे रोजी भारतात होणार दाखल
- विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेवर आपले बेगडी प्रेम दाखवू नये, रेमडेसिविरवरुन आ.सतिश चव्हाणांचा फडणवीसांना टोला!
- विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी, आज निघाले ‘एवढे’ कोरोना स्प्रेडर!
- ऑक्सिजन दुर्घटना टाळण्यासाठी ‘नंदुरबार पॅटर्न’ राबवा; आरोग्यमंत्री टोपेंचे सक्त आदेश


