Share

धनगरांच्या पारंपारिक वेशात पडळकरांनी घेतली शपथ, बहुजनांचा आवाज बनण्याचा दिला शब्द

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेले भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी गोपीचंद पडळकर खास धनगरी पारंपारिक वेशात विधानभवनात आले होते.

दरम्यान, विधानपरिषदेत फक्त धनगरच नाही तर समस्त बहुजन समाजाचा आवज होऊन सरकारला जाब विचारण्याचे काम करणार असल्याचा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला आहे. तर आजपर्यंत ज्या वंचित समाजाचा आवाज या सभागृहापर्यंत पोहचला नाही त्यांचा आवाज मी आता उठवणार असल्याच गोपीचंद पडळकर यांनी सांगितल आहे.

‘बहुजन समाजातील तरुणाला भाजपने संधी दिलेलं राष्ट्रवादीला रुचलेलं नाही’

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत त्यांनी आमदार म्हणून शपथ गेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती आमदार झाली आहे. याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती.

दरम्यान विधानभवनावर ठाकरे यांच्याशिवाय आठ सदस्य निवडून आले आहेत. यात शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या कचाट्यात अवकाळी पावसाचे संकट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!