Share

‘पाटील आधी चंद्रावर होते,मात्र टीका झाल्यानंतर ते नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले’

Published On: 

पुणे – एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैरान झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अश्याप्रकारे असंवेदनशील वागण्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र पक्षाचे कार्यकम धुमधडाक्यात करत असल्याचे दिसून येत आहे.

जयंत पाटील मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी परळीमध्ये पाटलांचं फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागताचा कार्यक्रम एवढा मोठा आणि भव्यदिव्य झाला की यावेळी बोलताना माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.

आता पाटलांच्या  बेजबाबदार वागण्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. पाटील आधी चंद्रावर होते. मात्र टीका झाल्यानंतर ते पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले, अशी खरमरीत टीका पडळकरांनी केली आहे. केवळ पडळकर नव्हे तर अनेक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!