🕒 1 min read
पुणे : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे यांचा आक्रोशः
महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. या खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय याकडे कुणाचंच लक्ष नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी यावेळी केला आहे.
मुख्यमंत्री स्वत:साठी वारंवार दिल्लीला गेले आहेत. पण महाराष्ट्रासाठी कधीच गेलेले नाहीत, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. एवढंच नाही तर यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोण माझ्या गटात येतो यासाठी प्रयत्न चालू आहेत. यानी केलेले चाळीस वार आम्ही पचवलेत. बारा खासदारांचे वार आम्ही पचवलेत. परंतु, आपल्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील तरूणांवर वार का करता? असा सवाल उपस्थित करत हे सरकार नाही तर सर्कस असल्याची टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान, कोविडच्या काळातही ज्यांनी राजकारण केलं, ते आम्हाला आज शिकवतायत की राजकारण करू नका. रोजगाराविषयी बोलणं हे राजकारण असेल तर ठीक आहे, आम्ही राजकारण करतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी राजकारण कशासाठी करायचं असतं? जर आम्ही प्रश्न विचारले, तर चुकलं कुठे?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Monica O My Darling | राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांची डान्स फ्लोअरला धूम, मोनिका ओ माय डार्लिंगचा टीझर रिलीज
- Chandrashekhar Bawankule | “बारामती मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले इरादे
- Viral Video | लग्नापूर्वी नववधू वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये पोहोचली, पहा व्हिडिओ
- Music Therapy Benefits : गाणी ऐका आणि निरोगी राहा! होय, संगीतामुळे राहू शकता तुम्ही तंदुरुस्त
- Raj Thackeray | ” ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… ” राज ठाकरेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
