🕒 1 min read
मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी होताना दिसत आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारमन देखील बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात भाजपाने तयारी सुरु केली आहे. अशातच अहमदनगर दौऱ्यावर असलेले भाजप पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
बारामती मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न – चंद्रशेखर बावनकुळे :
राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला बारामती मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आमचा प्रयत्न असला तरी सर्वकाही हे जनतेच्या हातामध्ये असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे बारामतीकरांचा कौल कुणाला हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच राहिलेली नाही.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात भाजप पक्षाची तयारी सुरुः
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात भाजपाने तयारी सुरु केली आहे. राज्यातील 16 मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री हे दाखल झाले आहेत. निवडणुकांना अवधी असला तरी, पक्ष संघटन आणि विस्तार यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय प्रदेशाध्यक्ष पदी बावनकुळेंची वर्णी लागल्यापासून संघटनेच्या विस्तारासाठी अधिकचे प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमनगर दौऱ्यावर असून त्यांनी शिंगणापूर येथील शनीचे दर्शन घेतले. तर आरती करुन विकास कामात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असावा तर राज्यातील जनता निरोगी रहावी असे साकडे घातले.
महत्वाच्या बातम्या :
- Music Therapy Benefits : गाणी ऐका आणि निरोगी राहा! होय, संगीतामुळे राहू शकता तुम्ही तंदुरुस्त
- Raj Thackeray | ” ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… ” राज ठाकरेंचा इशारा
- AIIMS Jobs 2022 | AIIMS मध्ये प्रोफेसर पदांसाठी 72 रिक्त जागा
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का! भाजप उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
- Narendra Modi | धक्कादायक! पिएफआयच्या निशाण्यावर होते नरेंद्र मोदी, कटासाठी ‘इतके’ कोटी पैसा जमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
