नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट देशासाठी अत्यंत त्रासदायक ठरली आहे. या लाटेत रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी अंशत: लॉकडाऊनही लावला आहे. मात्र, त्याचा परिणाम आता दिसून आला आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले. गेल्या पाच दिवसात पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात देशात ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी देशातील मृत्यूचा आकडा अजूनही जास्तच आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे ३ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १४ पेक्षा जास्त राज्यांनी लॉकडाऊन लावलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे देखील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे ऑक्सिजन आणि इतर सुविधांची कमतरता भासत होती. ती देखील आता काही अंशी कमी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझ्या भावाचा दंड भरण्यास तयार आहे’, भावासाठी कामरान अकमल सरसावला पुढे
- मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट
- श्रीलंका दौऱ्यावर नसणार विराट-रोहित
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

