मुंबई : दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला आहे. हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
शेतीची मशागत करुन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेतीत पेरणी करुन मान्सूनच्या पावसावर पिक फुलवण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यानं कोकणातील हर्रे परिसरात प्रवेश केलाय. सोलापूर मराठवाड्याच्या संलग्न भागात मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे.
यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर 11 ते 15 जून दरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांना मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या आनंदासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- घरकुलांसाठी बीएलसी प्रकल्पांना निधी मंजूर; सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न होणार साकार!
- गॅस एजन्सीच्या आमिषाने उद्योजकाला ५६ लाखांचा गंडा घालणारा गजाआड
- अमित देशमुखांच्या सूचनेनुसार शहराच्या स्वच्छतेसाठी सहा जेसीबी सज्ज; आता स्वच्छतेची प्रतीक्षा!
- ‘रस्त्याचे काम रखडल्याने कोरोना रुग्णांचे मृत्यू’, आ. धस यांचा आरोप
- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी कोसळले ते कळणारही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
