Share

घरकुलांसाठी बीएलसी प्रकल्पांना निधी मंजूर; सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न होणार साकार!

Published On: 

नांदेड: राज्यातील महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रातील ३८ शहरातील घरकुलांसाठी बीएलसी प्रकल्पांना राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य कुटुंबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शासनाच्या आवास योजनेअंतर्गत राज्य शासनाने एकूण २७१ कोटी ९६ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी अशी की या निदहितील सर्वाधिक वाटा हा नांदेड शहरास मिळणार आहे, एकूण २० कोटी १९ लाख रुपये शहराला मिळणार आहेत.

शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावतानाच नांदेड शहर झोपडपट्टीमुक्त झाले पाहिजे. यासाठी अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वीपासूनच प्रयत्न केले आहेत. जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथान योजनेंतर्गत शहरातील झोपडपट्टीत बीएसयुपी योजनेंतर्गत घरकुले बांधण्यात आली आहेत. झोपडपट्टीवासीय,आर्थिक दुर्बलघटक तसेच अल्प उत्पन्न असणाऱ्या सामान्यांचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी ना.चव्हाण यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता नांदेड शहराला सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे २ हजार १९ सामान्य कुटुंबियांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.

शासनाच्या आवास योजनेंतर्गत महापालिका व नगर परिषदा अशा ३८ शहरातील घरकुलासाठीचे अनुदान राज्य शासनाकडे प्रलंबित होते. राज्य शासनाचे अनुदान वितरित होताना अधिकाधिक निधी नांदेड शहराला मिळावा यातून सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी ना.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे अधिक निधीची मागणी लावून धरली त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून राज्यात सर्वाधिक २० कोटी १९ लाखांचा निधी नांदेड शहराला मिळाला आहे. यातून आपले सुंदर घरकुल असावे असे स्वप्न उराशी बाळगलेल्या २ हजार १९ कुटुंबियांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!