मुंबई: रिलायन्स जिओने 1 जानेवारीपासून राज्यांतर्गत व्हॉईस कॉल विनामूल्य केले आहे. आयआयसीच्या कारभारामुळे सध्या जिओ ग्राहकांकडून ऑफ-नेट व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारले जात होते. अशा सेवांवरील इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) संपल्यानंतर रिलायन्स जिओ इन्फोकॉम पुन्हा एकदा 1 जानेवारीपासून ऑफ-नेट राज्यांतर्गत व्हॉईस कॉल विनामूल्य करण्यात आले आहेत.
तर आता पुन्हा जिओच्या ग्राहकांना आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. यावेळी जिओने ग्राहकांसाठी केवळ जिओफोन युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा देणारा रिचार्ज प्लान आणला आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, ‘All in One’ अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे.यापूर्वी जिओफोन युझर्सना 4G नेटवर्क अंतर्गत ४९ रुपयांचा प्लान उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, त्याचा दर वाढवून आता ७५ रुपये करण्यात आला आहे.
‘All in One’ सेक्शन अंतर्गत अनलिमिटेड कॉम्बो प्लान जिओकडून युझर्ससाठी ७५ रुपयांपासून सुरू होऊन १८५ रुपयांपर्यंत हे प्लान उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ‘All in One’ अंतर्गत येणाऱ्या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ७५ रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एमबी डेटा आणि ५० एसएमएस ऑफर केले जात आहेत.
जिओ युझर्ससाठी ७५ रुपयांनंतर १२५ रुपयांचा प्लान देण्यात आला आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज ५०० एमबी डेटा आणि ३०० एसएमएस ऑफर केले जात आहे. यानंतर १५५ रुपयांचा प्लान जिओकडून देण्यात आला आहे. यामध्ये जिओ युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत.
‘All in One’मधील सर्वांत शेवटचा प्लान हा १८५ रुपयांना दिला जात आहे. यानुसार जिओ युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. एवढेच नव्हे तर जिओफोन प्लामध्ये जिओ अॅप्स जसे की, जिओटीव्ही आणि जिओ सिनेमा यांचा अॅक्सेस मोफत दिला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- सिडनी आणि वाद हा जुनाच; 2008 मध्येही घडले होते ‘असे’ काही…
- औरंगाबादसाठी ‘या’ मॉडेलने नाकारली ‘तुझ्यात जीव रंगला’तील भुमिका
- आता अजित पवार यांच्या पत्नीलाही मिळणार सुरक्षा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

